You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस फेक न्यूज : ‘या’ राज्यात आरोग्यसेवकांवरच होतात हल्ले
एकीकडे भारत कोरोनाचे नवे नवे उच्चांक मोडतोय, कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत आपण ब्राझीलला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. त्यातच कोरोनाचा सामना करतानाही काही राज्यांमध्ये प्रशासनाला ‘फेक न्यूज’शी लढावं लागत आहे.
पंजाबमधल्या कित्येक खेडेगावांमध्ये सोशल मीडियावर असे संदेश फिरत आहेत की, कोरोना व्हायरस अस्तित्वात नाही. आणि कोरोनाच्या नावाखाली रुग्णाला नेऊन त्यांच्या अवयवांची तस्करी होते. या भीतीमुळे निदान चाचण्यांसाठी गावात येणाऱ्या आरोग्यसेवकांना लोक गावात प्रवेश देत नाहीत. आणि वर दगड मारून हाकलून देतात.
यामुळे राज्य प्रशासनाला कोरोना बरोबरच अशा अफवांशी लढा द्यावा लागत आहे. बीबीसी प्रतिनिधी अरविंद छाब्रा यांचा पंजाबच्या डिबरा गावातून रिपोर्ट...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)