कोरोनातून बरं झालेले लोक जेव्हा इतर कोरोना रुग्णांची सेवा करतात...
Published
जेरुसलेमच्या हदासाह कोव्हिड रुग्णांसाठी एक पायलट प्रोजेक्ट नुकताच सुरू करण्यात आला.
कोव्हिड वॉर्ड मधील गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना एकटं वाटू नये म्हणून कोव्हिडमधून पूर्णपणे बरे झालेले स्वयंसेवक मदत करतायत.
त्यांना चहापाणी, हवं-नको ते पाहणं, त्यांचं म्हणणं ऐकून घेणं हे सारं ते करतायत. रुग्णांच्या नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना फोनवरून गप्पा मारण्यासाठी मदतही करतायत. हॉस्पिटलमध्ये कोरोना वॉरियर्सना या व्हॉलिंटिअर्सची चांगली साथ मिळतेय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)