कोरोना लक्षणं: लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणं वेगळी दिसतात?

Published

संशोधकांना असं लक्षात आलंय की लहान मुलांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला तर त्यांच्यात दिसणारी लक्षणं खूप वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. सध्याच्या घडीला खोकला, ताप तसंच चव किंवा वास न कळणं यांसारखी लक्षणं असलेल्या कोणत्याही व्यक्तीला युकेमध्ये टेस्ट करून घेता येऊ शकते.

पण क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्टच्या अभ्यासकांना कोव्हिड झालेल्या लहान मुलांमध्ये अतिसार आणि उलट्या ही लक्षणं सर्दीपेक्षा जास्त प्रमाणात आढळून आली. बीबीसीचे प्रतिनिधी फर्गस वॉल्श यांचा हा रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)