दिल्लीमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचे लॉकडाऊनमुळे हाल
Published
भारतात वेश्या व्यवसाय करणं बेकायदेशीर असून देह व्यापारावर बंदी आहे. तरी सुद्धा देशातल्या महानगरांमध्ये अनेक ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असलेला दिसतो.
भारतात लॉकडाऊन सुरू झालं आणि तेव्हाच दिल्लीतल्या जीबी रोडवरचा वेश्या व्यवसायही थांबला. कोरोनाची साथ पसरू लागल्यावर इथल्या सेक्सवर्कर लता या कट-कथा या सामाजिक संस्थेसोबत काम करू लागल्या.
संस्थेच्या माध्यमातून लता जीबी रोडवरच्या या वेश्या व्यवसायातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत. पण, लॉकडाऊनमुळे त्यांना पुन्हा वेश्या व्यवसायाकडे परतावं लागलं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)