कोरोना व्हायरस : कोव्हिडमधून बरं झाल्यावर काय काळजी घ्यायची? #सोपीगोष्ट156
Published
कोरोना व्हायरसची टेस्ट निगेटिव्ह आली, कोव्हिडमधून बरं झालो म्हणून गाफील राहून चालणार नाही.
हॉस्पिटलमधून घरी येणाऱ्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यायला हवी. एकदा बऱ्या झालेल्या व्यक्तीला पुन्हा संसर्ग झाल्याची प्रकरणंही आता आढळली आहेत.
शिवाय हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर पुढचे अनेक दिवस थकवा जाणवल्याचं, दम लागत असल्याचं अनेक रुग्णांनी बोलून दाखवलंय.
म्हणूनच कोव्हिड १९मधून बऱ्या होणाऱ्या रुग्णांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. काय काळजी घ्यायची, हे समजून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)