प्रणव मुखर्जी यांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न का पूर्ण झालं नाही? #सोपीगोष्ट154

Published

प्रणव मुखर्जी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. अनेकदा पक्षात भीष्म पितामहाची भूमिका त्यांनी पार पाडली.

काँग्रेसच्या या निष्ठावान नेत्याने माजी राष्ट्रपती होण्याबरोबरच परराष्ट्र व्यवहारमंत्री, अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं. पण, सर्वोच्च मानाचं पंतप्रधानपद मात्र त्यांना मिळालं नाही.

आधी इंदिरा गांधींनंतर आणि मग 1991 आणि 2004मध्येही त्यांना या पदाने हुलकावणी दिली. आणि त्यांचं हे एक स्वप्न अधुरंच राहिलं. काय होती तेव्हाची राजकीय परिस्थिती आणि पंतप्रधान न होता आल्याची सल प्रणव मुखर्जींना कधी वाटली का? पाहूया आजची सोपी गोष्टमध्ये....

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)