कोरोना महाराष्ट्र: मेळघाटातल्या आदिवासी महिला-बालकांना कुपोषणापासून दूर ठेवणारे कोरोना योद्धे

Published

कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून शाळा, अंगणवाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटमध्ये जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये कुपोषणाचे आकडे वाढतात आणि बालमृत्यूंचं प्रमाणही वाढतं.

या काळात लॉकडाऊन असतानाही डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या गरोदर मातांना आणि बालकांना आहार पोहचवण्याचं काम करणं हे तसं जोखमीचं. तरीही मेळघाटातल्या अंगडणाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि आरोग्यसेविका यांनी मेळघाटात आदिवासी भागात कुपोषण होऊ नये म्हणून कंबर कसली.

बीबीसी मराठीसाठी नितेश राऊत यांनी मेळघाटातून केलेला रिपोर्ट पाहूया.

एडिटिंग - अरविंद पारेकर

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)