तुम्ही कधी असा 'उलटा धबधबा' पाहिला आहे का? - पाहा व्हीडिओ

Published

ऑस्ट्रेलियातल्या सिडनीजवळील हा 'उलटा धबधबा' आहे. समुद्राकडून जोराचा वारा वाहतो आणि कड्यावर धडकतो, तेव्हा धबधब्याचं पाणी उलट्या दिशेनं उडतं, असं हवामानतज्ज्ञ सांगतात.

रॉयल नॅशनल पार्कजवळ वारे ताशी 74 किमी वेगानं वाहत होते. गेल्या काही दिवसांत मोठी वादळं आणि मुसळधार पावसाचा सिडनी आणि न्यू साऊथ वेल्सच्या काही भागांना तडाखा बसला आहे.

अशा हवामानामुळे हे नेत्रदीपक दृष्य दिसले आहे. या ठिकाणी वर्षातून काहीवेळा असं घडतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)