नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी: मोदी सरकारच्या या निर्णयामुळे तरुणांना नोकऱ्या मिळतील का?
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा देऊन संधीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी मोदी सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणण्याकरता National Recruitment Agency अर्थात राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्यात येणार आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय कॅबिनेटमध्ये झालेल्या निर्णयांची माहिती देताना National Recruitment Agency ची घोषणा केली. National Recruitment Agency मध्ये एकदा नोंदणी केली की, एकच परीक्षा देऊन युवकांना आपली योग्यता सिद्धता करावी लागेल. "युवकांना जागोजागी परीक्षा देण्यासाठी जावं लागू नये म्हणून एकच Common Eligibility test असेल. यात गुणवत्ता सिद्ध करुन उमेदवारांना पुढे जाण्याची संधी मिळू शकेल," असं प्रकाश जावेडकर यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हटलं.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)