कनिमोळी: हिंदी बोलणं हा भारतीयत्वाचा निकष असू शकतो का? #सोपीगोष्ट 140

व्हीडिओ कॅप्शन, हिंदी बोलणं हा भारतीयत्वाचा निकष असू शकतो का?
Published

केंद्रीय शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने अहिंदी राज्यांमधील शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्यावरून वाद पेटलाच होता. विरोधानंतर केंद्रसरकारने ही तरतूद मसुद्यातून वगळली.

आता हिंदी भाषा आणि भारतीयत्व यावरून वाद सुरू झाला आहे. द्रमुकच्या खासदार कनिमोळी करुणानिधी यांना चेन्नई विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महिला अधिकाऱ्याने 'आपको हिंदी नही आती। तो आप भारतीय कैसी? अशा भाषेत सवाल विचारला. कनिमोळी यांनी हा प्रसंग ट्विटवर सांगितला आहे.

नंतर औद्योगिक सुरक्षा दलाने झाल्या प्रकाराबद्दल चौकशीचे आदेश दिले असले तरी हिंदी भाषेला भारतीयत्वाशी जोडण्याचा प्रयत्न झाल्याने पुन्हा राजकीय वाद रंगू लागला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)