You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना महाराष्ट्र : आशा वर्कर्सवर सतत हल्ले का होत आहेत?
गेल्या चार महिन्यात कोरोना नियंत्रणासाठी काम करणाऱ्या आशा वर्कर्स तसंच त्यांच्या कुटुंबावर हल्ला झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. रोहिणी आहिरे त्यातल्याच एक. त्यांच्यावर आणि त्यांच्या पतीवर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता.
कोरोना काळात आरोग्य कर्मचारी तसंच आशा वर्कर्सवर हल्ले करणाऱ्या व्यक्तींना 7 वर्षांपर्यत कैद करण्याची शिक्षा सुनावणारा अध्यादेश केंद्र सरकारने एप्रिल महिन्यात काढला होता. राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनीही बीबीसीशी बोलताना म्हटलं होतं की आशांना न्याय देण्यासाठी ते प्रयत्न करतील. पण सरकारकडून असे हल्ले रोखण्यासाठी काहीही पावलं उचलली गेली नसल्याचं आशांचं म्हणणं आहे.
रिपोर्ट – अनघा पाठक, प्रवीण ठाकरे, निलेश भोसले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)