IPL 2020 चं नवं शहर दुबई आणि UAEमध्ये काय आहे कोरोनाची स्थिती?
IPL 2020 यंदा दुबई आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजे युएई देशात होणार आहे.
केंद्रसरकारचीही या प्रस्तावाला येत्या काही दिवसांत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. तीन महिन्यांच्या कोरोनाविरोधातल्या लढाईनंतर युएई देश आणि तिथलं दुबई हे मुख्य शहर या साथीतून आता सावरलंय. तिथे मॉल आणि पर्यटनाची केंद्रही पुन्हा सुरू झाली आहेत. खरंतर महाराष्ट्रात आढळलेला पहिला कोव्हिड रुग्ण हा दुबईतून पुण्यात आला होता. पण, स्वत: दुबई मात्र शिस्तबद्ध प्रयत्न आणि तंत्रज्ञानाची कास धरून कोव्हिडविरोधात विजयी झालीय. हा विजय त्यांनी कसा मिळवला याविषयी बीबीसी प्रतिनिधी रोनक कोटेचा यांचा दुबईहून खास रिपोर्ट
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)