You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जपानच्या हिरोशिमामधली ही झाडं जगभर का रुजवली जात आहेत?
दुसरं महायुद्ध संपता संपता अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणूबाँब टाकला ज्यात हजारो लोक मरण पावले. आणि शहरातल्या 60% इमारतीही जमीनदोस्त झाल्या. या घटनेला 75 वर्षं पूर्ण झाली.
अणूबाँब पडला तेव्हा हिरोशिमा शहरातली सगळी झाडंही जमीनदोस्त झाली. आणि ती पुन्हा फुलतील अशी आशाही लोकांना उरली नव्हती.
पण, यातल्या काही झाडांना नवे कोंब फुटले. त्यानंतर तोमोको वाटानाबे या महिलेच्या पुढाकाराने सुरू झाला एक प्रकल्प.
अणूबाँबमध्येही तग धरलेल्या या झाडांच्या बिया जगभरात जिथे जिथे अणूप्रकल्प आहेत तिथे लावायच्या. त्यातून जगाला शांततेचा संदेश जाईल ही त्या मागची कल्पना. बीबीसीच्या विटनेट हिस्टरी टीमचा हा विशेष रिपोर्ट...
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)