हाया सोफिया : देशात धार्मिक राष्ट्रवाद जेव्हा उफाळून येतो
अयोध्या शहरात राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला आणि तो ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत.
एखाद्या मंदिर उभारण्यासारख्या धार्मिक कार्यक्रमाला पंतप्रधानांनी इतकं महत्त्वं देणं काहींना खटकलं. पण, त्याचवेळी भारतीय जनता पार्टी या सत्ताधारी पक्षाचा हिंदुत्ववादाशी असलेला सबंध पाहता अनेकांना हे स्वाभाविकही वाटलं. केंद्र सरकार एका धर्माकडे झुकलेलं असण्याचा आरोप मात्र मागची काही वर्षं भारतात होत आला आहे.
विशेष म्हणजे याच काळात फक्त भारतातच नाही तर जगभरात अनेक देशांमध्ये धार्मिक राष्ट्रवादावर अनेक वाद झाले आहेत. आणि लोकांमध्ये दुरावा निर्माण झालाय. याचं एक ताजं उदाहरण म्हणजे टर्कीच्या इस्तंबूल शहरातली पुरातन वास्तू हाया सोफिया. टर्कीचे अध्यक्ष आर्दोआन यांनी अलीकडेच या वास्तूचं रुपांतर मशिदीत करण्याची घोषणा केली आणि ती प्रत्यक्षातही आणली. टर्की हा मुस्लीम बहुल धर्मनिरपेक्ष देश आहे. बीबीसी प्रतिनिधी झुबेर अहमद यांच्या या विशेष रिपोर्टमध्ये पाहूया हाया सोफिया वास्तूचा इतिहास आणि त्याचं धार्मिक राजकारण...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)