You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'हजची संधी गेली तरीही ईद सकारात्मक वातावरणातच साजरी करणार '
कोरोनाच्या उद्रेकामुळे यंदा मुस्लीम धर्मीयांच्या पवित्र हज यात्रेवरही निर्बंध आले आहेत. सौदी अरेबियाच्या बाहेरून येणाऱ्या भाविकांवर बंदी आहे. त्यामुळे फक्त स्थानिक लोकांनाच हज यात्रा करता येणार आहे.
लंडनमध्ये वास्तव्य असलेली अनिसा यावर्षीच्या ईद आणि हजयात्रेकडे आशेनं पाहत होती. मागच्या तीन वर्षांत तिने आई, सासरे असे जवळचे काही नातेवाईक गमावले आहेत. म्हणूनच हज यात्रेत अल्लाचा सहवास तिला मन:शांतीसाठी महत्त्वाचा वाटत होता. पण, आता निर्बंधांमुळे ती आणि कुटुंबीय हजला तर जाऊ शकणार नाहीत. तिने आपल्या गावीच सकारात्मक आणि आशादायी वातावरणात ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)