महिला आरोग्य: मासिक पाळीदरम्यान नैराश्य येत असेल हा आजार त्याला कारणीभूत आहे

व्हीडिओ कॅप्शन, मासिक पाळी दरम्यान प्रचंड भीती, नैराश्य आणि थकवा जाणवत असेल तर ही आहेत PMDDची लक्षणं
Published

मासिक पाळीच्या प्रिमेन्स्ट्रुअल डिस्फोरिक डिसॉर्डर(PMDD) या आजाराबद्दल तुम्ही ऐकलंय का? जगातल्या वीस पैकी एका महिलेला हा त्रास असू शकतो. पण दुर्दैवाने या आजाराविषयी ना फारसं संशोधन झालंय ना उपचार पद्धती विकसित झालीय.

मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे महिलांना प्रचंड भीती, थकवा किंवा नैराश्य येणं ही आजाराची लक्षणं आहेत. आणि कधी कधी ही लक्षणं इतकी उग्र होतात की महिला नैराश्यातून जीवाचं बरं वाईटही करून घेतात. अगदी जागतिक आरोग्य संघटनेनंही अगदी अलीकडे या रोगाची दखल घेतलीय. पण, हा आजार असलेल्या महिलांना मात्र दर महिन्यात एका मोठ्या दिव्यातून पार व्हावं लागतं. बीबीसीने अशा चार हजार महिलांशी संवाद साधला आणि त्यांना होणारा त्रास जाणून घेतला. हा रिपोर्ट म्हणजे PMDD या फारशा माहीत नसलेल्या महिलांमधील आजाराविषयी जागृती करणं हा ही आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)