You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महापारेषण आता 50 ड्रोन्सच्या मदतीने करणार वीज वाहिन्यांच्या टॉवर्सची देखरेख
तंत्रज्ञान माणसामुळे आणि माणूस तंत्रज्ञानाने कसा प्रगत होतो, याचं हे आणखी एक उदाहरण.
राज्यभरात वीज पोहोचवण्याचं काम करणाऱ्या महापारेषणने सध्या 50 ड्रोन्सच्या मदतीने टॉवर लाईन्सच्या देखरेखीचं काम सुरू केलं आहे.
देशात अशाप्रकारे ड्रोन्सची मदत वीज वाहिन्यांच्या टॉवरच्या देखरेखीकरिता करण्याची ही पहिलीच वेळ आहे, असा राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दावा केला आहे.
कर्मचाऱ्यांना आता प्रत्येक वेळी टॉवर्सवर चढून बिघाड पाहावा लागणार नाही. ड्रोन कॅमेऱ्यातून काही गडबड लक्षात आली तरच वर जावं लागणार. त्यामुळे या ड्रोन्सच्या वापराने वेळ, पैसा आणि मनुष्यबळाची बरीच बचत होणार आहे.
पाहा बीबीसी मराठीसाठी नागपूरहून प्रवीण मुधोळकर यांचा हा व्हीडिओ रिपोर्ट.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)