You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लॉकडाऊनमध्ये गेला रोजगार पण जागा झाला आतला संगीतकार
लॉकडाऊनमुळे लाखो कामगार आपापल्या गावी परत गेले. दुलेश्वर टंडी रायपूरमध्ये एका हॉटेलात मजुरी करायचे. त्यांनाही ओडिशाच्या आपल्या गावी परत जावं लागलं.
खरंतर दुलेश्वर रसायनशास्त्र पदवीधर आहेत. पण, नोकरी न मिळाल्याने मजुरी करावी लागत होती. लॉकडाऊनमध्ये ती ही गेली. पण, या परिस्थितीत जागा झाला त्यांच्यातला बंडखोर संगीतकार. सोशल मीडियावर त्यांनी आपली रॅप गाणी प्रसिद्ध करायला सुरुवात केली. आणि थोड्याच दिवसांत त्यांना प्रसिद्धीही मिळाली. त्यांच्या गाण्यात आहे व्यवस्थेविरुद्धचा राग आणि गरिबीची व्यथा...
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)