You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुरुंगवासाच्या भीतीने मी गाणंही बंद करावं का? – इराणी रॅपरची कैफियत
इराणमध्ये महिलांनी जाहीररित्या गाण्यावर बंदी आहे. कारण, महिलांच्या गाण्यामुळे पुरुषांमध्ये कामूक भावना जागृत होऊ शकते असा तिथल्या कट्टरतावादी शिया धर्मगुरूंचा समज आहे.
मागच्या दोन वर्षांत तिथे किमान बारा महिलांना फक्त त्या गातात किंवा सोशल मीडियावर गाणं प्रसिद्ध करतात म्हणून तिथल्या सरकारने अटक केली आहे. आणि तुरुंगात डांबलं आहे. अखेर तुरुंगवासाची किंवा चाबकाच्या फटक्यांची शिक्षा टळावी म्हणून अनेक गायिका आणि संगीतकार महिला इराण सोडून पळून गेल्या.
त्यातलीच एक आहे जस्टिन ही रॅपर. त्या ही दोन वर्षांपूर्वी तुरुंगात जाऊन आल्या आहेत. बीबीसीने जाणून घेतले त्यांचे अनुभव आणि स्त्री हक्कांसाठी गात राहण्याची त्यांची तळमळही...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)