सांगली वटवृक्ष वाचवा मोहीम: 400 वर्षं जुनं झाडं वाचवण्यासाठी पूर्ण गाव आलं समोर
Published
सांगली जिल्ह्यातील भोसे गावाच्या हद्दीत असलेल्या चारशे वर्ष जुन्या एका वडाच्या झाडासाठी हे वृक्षप्रेमी एकवटले आहेत.
रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 च्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. या मार्गावर मिरज ते पंढरपूर दरम्यान मौजे भोसे गावात गट नंबर 436 मध्ये यल्लमा मंदिराशेजारी 400 वर्षांचा जुना वटवृक्ष आहे. मात्र, महामार्गाच्या रुंदीकरणासाठी वडाचं हे झाड तोडण्यात येणार आहे. याला वृक्षप्रेमींनी विरोध केला आहे.
बीबीसी मराठीसाठी स्वाती पाटील यांचा रिपोर्ट
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)