You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रिलायन्स जिओ : गुगल, फेसबुक, इंटेल जिओमध्ये एवढी गुंतवणूक का करत आहेत? #सोपीगोष्ट 123
या कोरोना लॉकडाऊनदरम्यान मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ कंपनीने तब्बल दीड लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक भारतात आणलीये.
जिओ बाजारात आल्यापासून भारतातला टेलेकॉम सीन बदलून गेलाय. आणि आता तर त्याच्यात आणखी उलथापालथ अपेक्षित आहे... कारण गुगल, फेसबुक, क्वालकॉमसारख्या बड्या कंपन्यांनी रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक जाहीर केली आहे.
काय चाललंय काय रिलायन्स जिओचं? आणि या मोठ्या कंपन्या भारतात एवढा रस का घेतायत? तोही खासकरून रिलायन्स जिओमध्ये? आणि याचा तुमच्या किंवा माझ्या आयुष्यावर काही परिणाम होणार आहे का?
पाहू या... या सोपी गोष्ट मध्ये.
संशोधन –गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – शरद बढे
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)