सयामी जुळ्या मुलींना 18 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर केलं वेगळं - पाहा व्हीडिओ

Published

एर्विना आणि प्रेफिना या सयामी जुळ्या मुलींना 18 तासांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर वेगळं करण्यात आलं. या दोघींचे डोके आणि रक्तवाहिन्या जन्मत: एकमेकांच्या शरीराला जोडलेल्या होत्या.

इटलीतल्या लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये या जुळ्या मुलींवर जवळपास 30 डॉक्टर आणि नर्सच्या टीमनं शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेसाठी जवळपास एक वर्ष तयारी करण्यात आली होती. थ्रीडी तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला.

याआधाही या जुळ्या मुलींवर अशाप्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. आता केलेली शस्त्रक्रिया यशस्वी होईल आणि दोघीही इतरांसारखं सर्वसामान्य आयुष्य जगतील, अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केलीय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)