अमेरिकन सरकारच्या H1B व्हिसा निलंबनाच्या निर्णयाविरोधात भारतीयांची अमेरिकन कोर्टात धाव
Published
नोकरीनिमित्त अमेरिकेत राहणाऱ्या शंभरच्या वर भारतीयांनी H1B व्हिसाच्या निलंबनाविरोधात अखेर कोर्टात धाव घेतली आहे.
व्हिसाचा निलंबनाचा निर्णयात कायदेशीर त्रुटी असल्याचा त्यांचा आरोप आहे. व्हिसा निलंबनाबरोबरच या लोकांना अमेरिकेत प्रवेश करायला मनाई केल्यामुळे त्यांची त्यांच्या कुटुंबीयांशीही ताटतूट झाली आहे.
तेव्हा स्टेट डिपार्टमेंटने तातडीने प्रक्रिया सुरू करून व्हिसा द्यायचा की नाही याचा कायदेशीर निर्णय घ्यावा अशी विनंती या लोकांनी कोर्टाला केली आहे. बीबीसीचे प्रतिनिधी विनीत खरे यांनी काही अमेरिकन भारतीयांशी बोलून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)