कोरोनाविरोधातील लढाईत मास्क घालण्याची सवय जपानला उपयोगी पडली का?
Published
कोरोनाविरोधातील लढाईत मास्क घालणं किती मदत करतं यावर युरोप आणि अमेरिकेत भरपूर वाद सुरू आहेत.
डोनल्ड ट्रंप आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सेनारो यांच्या जाहीर वक्तव्यांमुळे या वादाला राजकीय स्वरुपही आलं. या नेत्यांसह जगभरात अनेकांना मास्क ही गैरसोय वाटते. तसंच कोरोना प्रसार थांबवण्यात त्यांचा प्रभावी उपयोग होत नाही, असंही त्यांचं म्हणणं आहे.
याउलट जपानमध्ये कोरोना असो वा नसो, लोक नियमितपणे मास्क वापरतात. आणि आता कोरोनाला रोखण्यातही हा देश यशस्वी ठरला आहे. या यशात मास्कच्या सवयीचा किती उपयोग झाला? बीबीसीचा खास रिपोर्ट...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)