You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोविसाकी : कोरोना बरा झाल्यावर लहान मुलांना होणारा हा आजार नेमका काय आहे?
कोरोनामुक्त झालोल्या लहान मुलांना एक दुर्मिळ इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे.
डॉक्टरांच्या मते, कोव्हिड-19 नंतर होणाऱ्या या इन्फेक्शनच्या लक्षणाबाबत आई-वडीलांनी आणि घरातील सर्वांनी लक्ष ठेवलं पाहिजे. कोव्हिड-19 नंतर होत असल्याने डॉक्टरांनी या आजाराला 'कोविसाकी' असं नाव दिलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनावर यशस्वी मात केलेल्या लहान मुलांमध्ये 'Multisystem Inflammatory Syndrome in Children' (MISC) किंवा 'Paediatric Multisystem Inflammatory Syndrome (PIMS) या आजाराच्या केसेस वाढत आहेत. मुंबई, ठाणे, वाशीच नाही तर वैजापूरसारख्या भागातही कोव्हिड-19 मुक्त झालेल्या मुलांना हे इन्फेक्शन झाल्याचं आढळून आलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)