You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: 'कोव्हिडची नाही, फेक न्यूजची भीती वाटते'
चंदिगडच्या पहिल्या कोव्हिड रुग्णाची नोंद झाली ती 18 मार्चला. लंडनहून चंदिगड आणि मग अमृतसरला गेलेली एक तरुणी कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं.
त्यानंतर महिलेची रवानही विलगीकरण केंद्रात करण्यात आली. यथावकाश ती कोव्हिडमधून पूर्णपणे बरी झाली. पण, मधल्या काळात समाजाकडून तिला चांगली वागणूक मिळाली नाही. जाणीवपूर्वक कोव्हिड पसरवल्याचा आरोप तिच्यावर झाला.
तर कोव्हिड असताना नातेवाईकांमध्ये फिरल्याचा आरोपही झाला. महिलेनं जिद्दीने या समस्यांना तोंड दिलं. फेसबुक पेज सुरू करून आपल्यावरील आरोप खोडून काढले. आणि कोरोनाविषयी जनजागृती करत प्लाझ्मा दानही केलं. कोव्हिड रुग्ण ते प्लाझ्मा दान करण्यापर्यंतचा तिचा प्रवास ऐकूया तिच्याच शब्दात...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)