कोरोना लॉकडाऊन: सुनिता यादव आणि गुजरातचे मंत्री कुमार कनानी यांच्या मुलातील वादाचं कारण काय?

Published

सुरतच्या लोकरक्षक दलातील कॉन्स्टेबल सुनिता यादव यांची ऑडिओ क्लिप आणि व्हीडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. सुरतचे पोलीस आयुक्त आर. बी. ब्रह्मभट्ट यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कॉन्स्टेबल सुनिता यादव सुरतच्या मिनी बाजार परिसरात ड्युटीवर होत्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांनी दोन व्यक्तींना अडवलं.

या दोन व्यक्तींनी त्यांचा मित्र प्रकाश कनानी यांना मदतीसाठी फोन केला. प्रकाश हे गुजरातचे आरोग्य मंत्री कुमार कनानी यांचे चिरंजीव आहेत.

प्रकाश कनानी त्याठिकाणी गेले असता त्यांना सुनिता यादव यांच्याशी वाद झाला. या वादाच्या ऑडिओ आणि व्हीडिओ क्लिप व्हायरल झाले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)