कोरोना: अमिताभ बच्चन यांच्या घराचे सॅनिटाइजेशन

Published

अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन यांनीच त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात माहिती दिली. अभिषेक बच्चन यांनासुद्धा कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

नानावटी हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअर विभागाचे डायरेक्टर जनरल डॉ. अब्दुल अन्सारी यांनी अमिताभ आणि अभिषेक यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.

अमिताभ यांच्या पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन तसंच अभिषेकची पत्नी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यांचे अहवाल अजून आलेले नाहीत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)