कोरोना औषध : भारतात बनणाऱ्या कोरोनाविरोधी लशीचं काम कुठवर आलंय?
भारतीय बनावटीची कोव्हिड-१९ विरोधातील लस 15 ऑगस्टपर्यंत लोकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
देशातील सर्वोच्च संशोधन संस्था इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) हैद्राबादच्या भारत बायोटेक कंपनीसोबत यासाठी करार केलाय.
सध्या लशीच्या मानवी प्रयोगाची तयारी सुरू आहे आणि पुढच्या महिनाभरात या प्रयोगाचे अहवाल मनासारखे आले तर तिचं उत्पादनही लगेच सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे. सध्या देशातील 12 वैद्यकीय संस्थांमध्ये लशीचे मानवी प्रयोग होणार आहेत.
आणि त्यानंतर लशीची परिणामकारकता तपासली जाईल आणि लस सामान्य ग्राहकांसाठी खुली करण्यात येईल. भारत बायोटेक या कंपनीबरोबरच झायडस कंपनीची कोरोना विरोधी लसही अंतिम टप्प्यात आहे. या लशीच्या चाचण्यांवर अलीकडे उलट सुलट चर्चा सुरू झाली होती.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 )