You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना काळात छोट्याशा कुनरिया गावाने दिला 'आत्मनिर्भर भारत'चा धडा
गुजरातच्या कच्छ भागातलं कुनरिया हे गाव एरवी नकाशावर दिसणारही नाही. पण, या गावाने कोरोनाच्या काळात एक आदर्श ठेवला आहे.
लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला 'आत्मनिर्भर भारत'चा नारा दिला. पण कुनरिया गावाने तो त्यापूर्वीच अंमलात आणला.
स्थलांतरित मजूर गावी परतले पण, त्यांच्याकडे गावात रोजगार नव्हता. कुनरिया गावाच्या पंचायत समितीने परिस्थितीचा विचार करून एक तोडगा काढला. गावातच मनरेगाची कामं सुरू केली आणि त्यातून चक्क 200 कुटुंबांना रोजगार मिळाला. त्यातून हे गाव आता झालं आहे आत्मनिर्भर.
आता गावातील लोकांना रोजगारासाठी शहरात जाण्याची गरज नाही. पाहा हा व्हीडिओ.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 )