कोरोना लॉकडाऊन : कडूबाई खरात यांच्या वाट्याला पुन्हा जगण्यासाठीचा संघर्ष

Published

कडुबाई खरात यांच्या बाबासाहेब आंबेडकरांवरील गाण्याचा एक व्हीडिओ फेसबुकवर वायरल झाला आणि त्या चर्चेत आल्या.

कडुबाई बाबासाहेबांवरील गाणी गाऊन आपला उदरनिर्वाह करत होत्या. सोशल मिडियावर त्यांच गाणं व्हायरल झाल्यावर त्यांचा अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आला. त्यांना गाण्याच्या कार्यक्रमांचे निमंत्रण येऊ लागले आणि त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला.

पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

व्हीडिओ - राहुल रणसुभे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)