कोरोना लॉकडाऊननंतर मास्क बनवण्याच्या व्यवसायाने कुटुंबाला आधार दिला

व्हीडिओ कॅप्शन, लॉकडाऊननंतर हाल झालेल्या कुटुंबाला कोरोना मास्कने दिला आधार
Published

लॉकडाऊनमुळे पंजाबच्या कुलविंदर कौर यांच्या कुटुंबावर उपाशी राहण्याची वेळ आली.

तामिळनाडूत स्थलांतरित मजूरीवर काम करणारे त्यांचे पती लॉकडाऊन जाहीर झाल्यावर तिथेच अडकले. अशा परिस्थितीत घरात अन्न शिजवणंही कठीण झालं.

आपल्या दोन मुलांची उपासमार होऊ नये म्हणून कुलविंदर कामासाठी घराबाहेर पडल्या. अशा वेळी कोरोना संकटाने त्यांच्यासमोर एक संधी उभी केली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)