कोरोना कुपोषणः येमेनमधील दहा लाख मुलांचा जीव धोक्यात

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना उद्रेक आणि कुपोषणामुळे येमेनमधील दहा लाखांच्या वर मुलांचा जीव धोक्यात
Published

कोरोना उद्रेकामुळे जगात आर्थिक संकट उभं राहिलं आहे. पण, येमेन सारखा देश जो आधीच जागतिक मदतीवर अवलंबून आहे, तिथे कोरोना बरोबरच कुपोषण आणि बालमृत्यूंचं मोठं संकट उभं राहिलं आहे.

तिथल्या परिस्थितीचा फटका निष्पाप लहान मुलांना बसतो आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने तर इशारा दिला आहे की, तातडीने जागतिक मदत मिळाली नाही तर इथल्या दहा लाखांच्या वर मुलांचा या संकटाने मृत्यू होईल.

पाच वर्षं सुरू असलेलं यादवी युद्ध आणि त्यातच कोरोनाचा उद्रेक यामुळे जागतिक मदत मिळणंही कठीण झालं आहे. इथलं युद्धही संपत नाही. त्यामुळे येमेनमध्ये मानवतेवरचं सगळ्यात मोठं संकट उभं राहिलं आहे. बीबीसीचे मध्य-पूर्व एडिटर जेरेमी बॉवेन यांचा हा खास रिपोर्ट. यातील काही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)