You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेतीसाठी या शेतकऱ्यांनी बांधली तब्बल 5 कोटी लीटरची पाण्याची बँक - पाहा व्हीडिओ
सोलापूरमधल्या अंकोली गावात 2004 साली 22 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ही वॉटर बँक सुरू केली आहे.
पावसाळ्यात या बँकेत विहीरीतलं जास्तीचं पाणी साठवलं जातं. तर उन्हाळ्यात शेतासाठी वापरलं जातं. याची क्षमता 5 कोटी लीटर आहे. त्यापैकी 3 कोटी लीटर पाणी वापरलं जातं आणि 2 कोटी लीटर गंगाजळी म्हणून ठेवलं जातं.
जलतज्ज्ञ अरुण देशपांडे यांनी ही मोहीम राबवली आहे. शेतकऱ्यांनी गटशेती करून अशी सामुहिक वॉटरबँक बांधावी. त्यानंतर ती महिला शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावी, यासाठी देशपांडे प्रयत्न करत आहेत.
रिपोर्ट - गणेश पोळ
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)