कोरोना लस – जास्त परिणामकारक लशीवर लंडनमध्ये संशोधन सुरू

Published

युकेमध्ये एका नवीन कोरोना लसीवर संशोधन सुरू झालं आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये शेकडो लोकांवर तिच्या चाचण्या केल्या जातील.

इम्पिरिअल कॉलेज ऑफ लंडनमधल्या संशोधकांनी ही लस विकसित केली आहे. दुसरीकडे ऑक्सफर्ड विद्यापीठातही अशाच एका लशीच्या चाचण्या सुरू आहेत.

एकंदरीत जगभरात सध्या 120 पेक्षा जास्त कोरोना लशींवर काम सुरू आहे. पण, इम्पिरिअल कॉलेजमध्ये विकसित होणारी लस क्रांतीकारी आहे. कारण, खूप कमी मात्रा वापरली तरी तिचा परिणाम खूप मोठा आणि जास्त काळ टिकणारा आहे.

त्यामुळे या लशीच्या चाचण्या यशस्वी ठरल्या तर एक लीटर द्रव्यात काही लाख लोक बरे होऊ शकतात. त्याविषयी बीबीसी प्रतिनिधी फर्गस वॉल्श यांचा खास रिपोर्ट...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता )