'कोरोनातून बरे झालात तरी मागे उरतो फुप्फुसाला आजार'

Published

ग्रेट ब्रिटनममधील डॉक्टरांना अलीकडे वेगळी भीती वाटत आहे. कोव्हिड-19मधून बरे झालेल्या लोकांची पुन्हा एकदा चाचणी घेण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली आहे. ही चाचणी कोव्हिड साठी नाही तर या रुग्णांच्या फुप्फुसांची करायची आहे.

कारण, कोव्हिड झालेल्या आणि तेव्हा गंभीर स्थिती असलेल्या रुग्णांच्या फुप्फुसांना कायमची इजा पोहोचण्याची शक्यता आहे असं एका संशोधनातून पुढे आलं आहे. 20 ते 30 टक्के रुग्णांची फुप्फुसं एका पाहणीत कमजोर झाल्याचं आढळलं. त्यामुळे त्यांना श्वसनाचे विकार जडले आहेत. त्याचबरोबर खोकला आणि थकव्याचाही त्रास होतो आहे. त्याविषयीचा हा खास रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)