'भारत-चीन सीमेवर भारताची गस्त कमी पडतेय' - ITBPच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा आरोप

Published

भारत आणि चीन दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताची गस्त कमी पडतेय, असा आरोप इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलाचे माजी उपमहानिरीक्षक जयवीर चौधरी यांनी बीबीसीशी बोलताना केला आहे.

गस्तीमधील या त्रुटी आता प्रकर्षाने जाणवायला लागल्याचं चौधरी यांनी बीबीसी प्रतिनिधी जुगल पुरोहित यांच्याशी बोलताना सांगितलं. ही संवेदनशील आहे आणि तिथला प्रश्न हाताळण्यात केंद्रसरकार कमी पडत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्याचवेळी इंडो-तिबेटन पोलीस दल भारतीय सैन्यदलाबरोबर कसं काम करतं हे ही चौधरी यांनी समजून सांगितलं. पाहा ही सविस्तर मुलाखत...

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)