भारत - चीन सीमा तणाव : 'त्याचा साखरपुडा झाला होता, मात्र आज त्याच्या मृत्युची बातमी आली'

व्हीडिओ कॅप्शन, भारत - चीन सीमा तणाव : 'त्याचा साखरपुडा झाला होता, मात्र आज त्याच्या मृत्युची बातमी आली'
Published

भारत – चीन संघर्षात गलवान खोऱ्यात मारल्या गेलेल्या भारतीय सैनिकांपैकी चार जण पंजाबचे आहेत. या चौघांपैकी एक म्हणजे गुरविंदर सिंग.

या मृत्यूच्या बातमीने त्यांच्या कुटुंबाने उज्ज्वल भविष्यासाठी पाहिलेली स्वप्न आता धुळीला मिळाली आहेत. त्यांच्या लग्नाच्या तयारीत असलेल्या कुटुंबीयांना आता त्यांच्या मृतदेहाची वाट पाहावी लागतेय.

सुखचरण प्रीत यांचा गुरविंदर सिंग यांचं मूळ गाव असलेल्या पंजाबच्या संग्रूर जिल्ह्यातल्या टोलेवाल गावातून हा रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)