भारत चीन सीमा तणाव : गलवान खोऱ्यात त्या रात्री नेमकं काय घडलं होतं?

व्हीडिओ कॅप्शन, भारत चीन सीमा तणाव : गलवान खोऱ्यात त्या रात्री नेमकं काय घडलं होतं?
Published

गेल्या काही आठवड्यांपासून भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव आहे. दोन्ही देशांनी आपापल्या नियंत्रण रेषेवर सैनिकांची गस्त वाढवली. गलवान खोऱ्यावरुन दोन्ही देशांमध्ये तणावाला सुरुवात झाली आणि 15 जूनच्या रात्री दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर आले.

गलवान खोऱ्याच्या सीमेवर चीनी सैन्याने तंबू उभारले असल्याचं भारताकडून सांगण्यात येत आहे. यामुळे भारतीय लष्करानं या ठिकाणी सैन्य दल वाढवले आहे. तर दुसऱ्या बाजूला भारताकडूनच गलवान खोऱ्यात बेकायदा हालचाली सुरू असल्याचा दावा चीननं केला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)