You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना औषध: डेक्झामेथाझोन या स्वस्त आणि मस्त औषधामुळे कोव्हिड-19 रुग्णांना मिळतेय नवसंजीवनी
कोरोनावरच्या लशीवर अख्ख्या जगात संशोधन सुरू आहे. त्याचवेळी कोव्हिड-19मुळे होणारे मृत्यू थांबवता येतील अशा एका औषधाचा शोध लागला आहे. डेक्झामेथाझोन हे स्टेरॉईड बाजारात सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध आहे आणि या औषधाने ऑक्सिजन पातळी कमी झालेले आणि मृत्युच्या दारात असलेल्या रुग्णांना जीवनदान मिळालं आहे.
कोरोनाच्या साथीची सुरुवात झाल्यापासून हे औषध वापरलं असतं, तर एकट्या युकेमध्ये 4000 ते 5000 जीव वाचले असते असं तज्ज्ञांना वाटतं. या औषधाची परिणामकारकता इंग्लंडच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही मान्य केली आहे.
बीबीसी प्रतिनिधी फर्गस वॉल्श यांचा हा रिपोर्ट बघूया.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)