लॉकडाऊनमुळे बस कंडक्टर असलेला 'तो' आता रोजंदारीवरचा मजूर झालाय
कोरोना उद्रेकामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर गुजरातमधल्या दिनेश परमार यांना बस कंडक्टर असूनही रोजंदारीवरचं काम स्वीकारावं लागलं.
कोरोना व्हायरसमुळे आलेल्या या लॉकडाऊनच्या काळात आपल्या कुटुंबाला पोसण्यासाठी त्यांना हे रोजंदारीचं काम करावं लागत आहे. गेल्या 12 वर्षांपासून दिनेश महानगरपालिकेच्या बस सेवेमध्ये कंडक्टर म्हणून काम करत होते.
मात्र, गेल्या तीन महिन्यांत त्यांनी एकदाही कंडक्टरचा युनिफॉर्म घातलेला नाही. लॉकडाऊनमुळे इथली बससेवा थांबलेली असून तेव्हापासून आतापर्यंत दिनेश यांना पगार मिळालेला नाही. महापालिकेची बससेवा पुन्हा सुरू होईल आणि पुन्हा कंडक्टरचं काम करता येईल अशी आशा दिनेश परमार यांना आहे. दिनेश यांच्या सद्यस्थितीवरचा बीबीसी प्रतनिधी तेजस वैद्य यांचा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)