गुजरात : पाणी भरण्याची पायपीट अखेर सुसह्य झाली!

Published

गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातल्या एका आदिवासी जमातीच्या महिलांना पाणी आणण्यासाठी मैलोनमैल पायपीट करत जावं लागायचं.

डोक्यावर हंडे, कळश्या घेऊन या महिला उन्हातान्हात पाटपीट करत जायच्या. त्यात पाणी मिळेलच याची खात्री नाही.

किमान त्यांचे शारिरीक श्रम कमी व्हावे यासाठी गुजरातच्या एका स्वयंसेवी संस्थेने त्यांना या ढकलगाड्या दिल्या. ही अशी 'वॉटरव्हील्स' पूर्वीपासून आफ्रिकेत आणि भारतात राजस्थानातही वापरली जातात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)