कोरोना: चीनची राजधानी बिजिंगमध्ये आली कोरोनाची दुसरी लाट?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना : चीनची राजधानी बिजिंगमध्ये आली कोरोनाची दुसरी लाट?
Published

चीनची राजधानी बिजिंगमध्ये नव्याने संसर्ग झालेले 36 कोव्हिड रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे राजधानीत कोरोनाची दुसरी लाट आल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. चीनचे उपराष्ट्राध्यक्ष सन चुनलान यांनी पुन्हा कोरोना प्रसार वेगाने होऊ शकतो अशी गंभीर सूचना देत यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशननुसार, दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच इथे रुग्ण आढळलेत. गेल्या शनिवारी तर बिजिंगमध्ये थेट 36 कोव्हिडचे रुग्ण आढळले. हे सगळे रुग्ण इथल्या झिनफॅदी मार्केटशी संबंधित आहेत. आशियातलं सर्वांत मोठं होलसेल विक्री करणारं मार्केट म्हणून हे ओळखलं जातं.

सध्या संसर्गाचे हे आकडे फार मोठे नाहीत. मात्र, गेल्या 50 दिवसांत एकही रुग्ण न आढळल्याने चीनने नवी सुरुवात केली होती. त्यातच नव्या उद्रेकाची भीती व्यक्त होत आहे. बिजिंगमधल्या सद्यस्थितीवरचा हा रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7