You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानात हिंदू समुदायाची घरं का पाडण्यात आली?
पाकिस्तानात दक्षिण पंजाबमध्ये हिंदू समुदायाची 22 घरं पाडण्यात आली आहेत. मोहम्मद बुटा नावाच्या स्थानिक रहिवाशाने तक्रार केल्याने तिथल्या जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही ही कारवाई झाल्याबद्दल घरं पडलेल्या हिंदू समुदायाने कोर्टाचा अवमान झाल्याची याचिका स्थानिक कोर्टात दाखल केली आहे. तसंच, हिंदूंच्या श्रद्धेवरून त्यांना लक्ष्य केल्याचा आरोप पाकिस्तानातल्या मानवाधिकार आयोगाने केला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)