You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिका हिंसाचार : जॉर्ज फ्लॉईड आणि वर्णद्वेषावरून उफाळण्याचा इतिहास #सोपीगोष्ट 90
'मला श्वास घेता येत नाहीय' हे अमेरिकेतल्या एका कृष्णवर्णीय माणसाचं वाक्य जगभरात गाजतंय. या माणसाचा जीव एका गोऱ्या पोलिसामुळे गेला. ही ठिणगी पडताच आता देशभरात वणव्यासारख्या दंगली पसरल्या आहेत.
आधीच कोरोनामुळे हैराण झालेल्या अमेरिकेत हे नवं मोठं संकट आलंय. तिथे जाळपोळ, लुटालूट होतेय. 40 शहरांमध्ये कर्फ्यू लागलाय. पण असा उद्रेक होण्याची ही पहिली वेळ नाही. काळ्या-गोऱ्यांच्या संघर्षावरून अमेरिकेत 4 वर्षं गृहयुद्ध पेटलं होतं.
कोव्हिडच्या आरोग्य संकटात सोशल डिस्टन्सिंगचा इशारा झुगारून हजारो अमेरिकन रस्त्यांवर उतरून निदर्शनं करतायत.
संशोधन आणि सादरीकरण - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)