कोरोना तपासणी युकेमधले डॉक्टर्स रुग्णाला न भेटता कशी करत आहेत?

Published

युकेमध्ये कोरोना व्हायरस वेगाने पसरल्याने इथल्या आरोग्य यंत्रणेवर ताण आलाय. मात्र, यातूनही मार्ग काढण्यासाठी युकेमधल्या डॉक्टरांनी आता तंत्रज्ञानाचा आधार घेत दूरस्थ पद्धतीने रुग्णांची तपासणी सुरू केलीये.

यासाठी ते विविध अॅप्स आणि सॉफ्टवेअर्ेसचा वापर करत आहेत. याद्वारे त्यांना रुग्णांचे रिपोर्ट्स, स्कॅन्स, तसंच व्हीडिओ कॉलद्वारे लक्षणांची माहिती घेऊन निदान करणं शक्य होतंय. अगदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णाचे हृदयाचे ठोके तपासणे, फुप्फुसाची तपासणी करणंही त्यांना शक्य झालंय.

याचाच आढावा या रिपोर्टमध्ये घेण्यात आलाय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)