'कृष्णवर्णीय असल्यामुळे मला आता अमेरिकेत भीती वाटते'- पाहा व्हीडिओ
Published
जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा अमेरिकेत पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर हजारो लोक अमेरिकेच्या रस्त्यांवर उतरले आहेत.
अमेरिकन पोलीसांकडून कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अत्याचारांचं हे ताजं उदाहरण असल्याचं सांगत कायला बर्जेस या आंदोलन करत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलनांनी हिंसक वळण घेतलंय.
जॉर्ज यांचा मृत्यू ही एक दुर्दैवी घटना असल्याचं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं. पण जमाव त्यासाठी कायदा हातात घेऊ शकत नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)