महाराष्ट्र आणि भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना लॉकडाऊन उठवावा का? #सोपीगोष्ट 87

Published

24 मार्च रोजी देशात कोव्हिड-19 च्या रुग्णांची संख्या 564 होती आणि राज्यातल्या रुग्णांची संख्या 101 होती. 2 महिन्यांच्या लॉकडाऊननंतर भारतातल्या रुग्णांची संख्या 1 लाख 51 हजार आहे.

त्यापैकी एक तृतियांश रुग्ण हे महाराष्ट्राचे आहेत. म्हणजेच महाराष्ट्रातल्या रुग्णांची संख्या 54,758 इतकी आहे. तेव्हा लॉकडाऊनचा उद्देश सफल झाला नाही का? असा प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो.

संख्या वाढत असताना लॉकडाऊन उठवला जाणार आहे, असं दिसत आहे तेव्हा सरकारची पुढची योजना नेमकी काय आहे असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विचारला आहे.

लॉकडाऊन ज्या उद्दिष्टासाठी लावण्यात आला होता, ते उद्दिष्ट आपण गाठलं आहे का? असा सवाल आता सर्व स्तरातून येत आहे. आजच्या सोपी गोष्टमध्ये आपण हेच पाहणार आहोत की भारतात लॉकडाऊन यशस्वी झाला की नाही?

संशोधन - तुषार कुलकर्णी

सादरीकरण - विनायक गायकवाड

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

एडिटिंग - तुषार कुलकर्णी