नासा आणि स्पेस-एक्सच्या अंतराळ मोहिमेमागचं सत्य जाणून घ्या

व्हीडिओ कॅप्शन, नासा आणि स्पेस-एक्सच्या अंतराळ मोहिमेमागचं सत्य जाणून घ्या
Published

नासा आणि स्पेस-एक्स यांच्या संयुक्त मोहीमेद्वारे एक यान दोन अंतराळविरांना घेऊन अंतराळात झेप घेणार आहे. हे अवकाश यान अमेरिकेच्या अंतराळ प्रवासाच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब करेल.

व्यावसायिक कंपनी स्पेस-एक्सच्या मालकीचं हे यान आहे. त्यामुळे अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेसाठीही ही वेगळी घटना आहे. अब्जावधी अमेरिकी डॉलर्सच्या झालेल्या कराराचा हे यान एक भाग आहे. नासाला आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी यानांची सेवा पुरवणं हा यामागचा हेतू आहे.

कंपनीच्या या करारामुळे मंगळ मोहीमांसारख्या प्रकल्पाला देखील नासाला त्यांची साथ मिळणार आहे. अंतराळ संशोधनातला हा नवा टप्पा ठरणार आहे.

या सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)