कोरोना लॉकडाऊन: परदेशात शिक्षण घेण्याचं विद्यार्थ्यांचं स्वप्न हवेतच विरणार का?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे परदेशात शिक्षण घेण्याचं विद्यार्थ्यांचं स्वप्न हवेतच विरणार का?
Published

जगभरात नवीन शैक्षणिक वर्षं सुरू होत आहे. अनेक भारतीय विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं परदेशात उच्चशिक्षण घेण्याचं. पण, यंदा कोरोनाच्या उद्रेकानंतर सुरू झालेला लॉकडाऊन अजून संपलेला नाही. अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्रवास कधी सुरू होईल सांगता येत नाही.

अशात परदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न बाळगलेल्या अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. परदेशात जाता येईल का हा एक प्रश्न. आणि पुढे कधी गेलं तरी कोव्हिड नंतरच्या जगात काय बदललेलं असेल याचीही कल्पना अजून नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ अधांतरी आहे.

त्याचवेळी परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांवर अनेक जागतिक विद्यापीठांची इकॉनॉमी चालते. त्यांनाही मोठा आर्थिक फटका बसणार आहे. याविषयीचा बीबीसी प्रतिनिधी निकिता मंढाणी यांचा हा रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)